श्री अमोल अनंत केळकर
☆ हा ‘ टॅग ‘ गाडीला लावीतसे ☆
(मुळ गाणे : हा छंद जिवाला लावि पिसे !)
तिथे टोल सखे भरपूर दिसे
खिशात ‘ मनी ‘ सर ले भलते
दिनरात तुझा रे ध्यास जडे
हा ‘ टॅग ‘ गाडीला लावीतसे
ती रांग तुझ्या नजरेमधली
गाडी आपली नेहमीच बळी
‘टॅगात ‘ असेल जादुखरी
गेलो ओलांडुनी ‘फास्ट’ कसे
आरशाच्या मागे चिकटव वरी
हा स्कँन होतसे लईभारी
तो मार्ग मग घायाळ करी
वेगात पळाली कार दिसे
© श्री अमोल अनंत केळकर
१३/०४/२०२०
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
१८/१२/१९
☆ मुळ गाणे : हा छंद जिवाला लावि पिसे ! ☆
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसें!
ती वीज तुझ्या नजरेमधली
गालीं खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरिं हसति गुलाबी गेंद कसे!
नखर्यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफांत बुडाले भान असे!