☆ सुश्री स्वप्ना अमृतकर ☆
सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं। आप कविता की विभिन्न विधाओं में दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की हायकू शैली में कविता “गुलमोहर”(७ रचना)”। प्रत्येक वर्ष 1 मई को सतारा जिले में गुलमोहर का जन्म दिवस मनाया जाता है और यह क्रम 1999 से चला आ रहा है।
सुश्री स्वप्ना अमृतकर जी के ही शब्दों में – दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात लाल,केशरी,पिवळ्या फुलांचा बहर पसरलेला दिसतो,हा बहर असतो गुलमोहर फुलांचा.रणरणत्या ऊन्हातही दिसतो देखणा माझा लाडका गुलमोहर सखा साजणा.. कवीमनाला लिखाणाची उभारी देतो अन् तो स्तब्ध जसाच्या तसाच मोहात पाडतो हा गुलमोहर. महाराष्र्टात १९९९ पासून सातारा जिल्ह्यात गुलमोहराचा वाढदिवस साजरा केला जातो.
म्हणून आजच्या गुलमोहर दिनानिमित्त पुढील माझी हायकू
☆ गुलमोहर दिनानिमि
(हायकू: “गुलमोहर”)
गुलमोहर
ग्रीष्मात बहरला
जीव गुंतला १,
बहरामुळे
वाराही थबकला
सांजवेळेला २,
पुलावरून
फुलांचा पाझरला
बहर ओला ३,
नदीचा काठ
गुलमोहर फांदी
पाखरें नांदी ४,
ऊन्हाळ्यातच
सुनसान रस्त्यात
रूबाबदार ५,
अनाथ वाटे
लाल,केसरी सडा
नसे सरडा ६,
जन्म मिळावा
हो गुलमोहराचा
भुईवरचा ७..
© स्वप्ना अमृतकर
पुणे, महाराष्ट्र
चित्र सौजन्य – सुश्री ज्योति हसबनीस, नागपुर
Surekh kavya!
Very nice haiku …amazing thought process has been putted in writting.
अप्रतिम , स्वच्छंद फुलांची रंगीत कहानी, जागवी मनात धुंद आठवणी…..
Nice writing Swpanali …good one..?