(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी की एक भावप्रवण कविता मुका होता. . !)
☆ मुका होता. . ! ☆
मुका रसिक म्हणूनी
कुणी हिणवले त्याला
भाषा शब्दांची बोलत
मुका होता, कवी झाला. . . !
वाचा गेली अपघाती
बोलणारा मूक झाला
त्याच्या मुक्या वेदनेचा
कवितेत जन्म झाला. . . . !
मुकेपणा लेणे त्याचे
काव्यविश्व साकारते
एका एका शब्दातून
मायबोली आकारते. . . . !
मुक्याचीच मायबोली
लेखणीत सामावली
त्याच्या काळजाची भाषा
आसवात पाणावली.. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.