कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 132 – विजय साहित्य
☆ भगवान महावीर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
सिद्धार्थ त्रिशला
जनक लाभले
महावीर भले
उद्धारक. . . . !
केला परीत्याग
राज वैभवाचा
वर्धमान साचा
महावीर. . . !
मानव जातीचे
कल्याण साधले
आयुष्य वेचले
शुभंकरी.. . !
पंचशील तत्वे
केला अंगीकार
अंतरी संचार
तीर्थंकर.. . !
अहिंसा, असत्य
अपरिग्रहाचे
आणि अचौर्याचे
मूल तत्व.
मूलत्तवी दिले
ब्रम्हचर्य सेतू
सुखशांती हेतू
पंचशील. . . !
जगा नी जगू द्या
केला उपदेश
स्वार्थ निरपेक्ष
सर्वोदयी.. . !
शुक्ल त्रयोदशी
चैत्र महिन्याची
नांदी कल्याणाची
जन्मोत्सवी.. . !
आत्मिक सुखाचा
मार्ग दाखविला
दीप चेतविला
ज्ञानमयी.. . !
असा भगवान
पूज्य महावीर
झुकविले शीर
वंदनेत.. . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈