कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 177 – विजय साहित्य
☆ मनास वाचूया… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
चला लेखणी देखणी करूया
शब्द दर्पणी मनास वाचूया ||धृ ||
☆
अनुभूतीचा रंग मनोहर
भाव भावना शब्द सरोवर
मनांगणीचे विश्व सजवूया… ||१||
☆
वास्तवतेची, शब्द बांधणी
कल्पकतेची, कला अग्रणी
प्रतिभा शक्ती, अक्षर लिहूया… ||२||
☆
कविता आहे, फुल बकुळीचे
अक्षय लेणे, गुलाब कळीचे
कथा, कविता, साहित्य निर्मूया…. ||३||
☆
साहित्यातील , नवीन वळणे
शब्द संपदा, माणूस कळणे
नात्यामधले, बंधन जपूया… ||४||
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈