कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है आपकी कामगारों के जीवन पर आधारित एक विडंबन रचना “वाट वाकडी” )
☆ विजय साहित्य – विडंबन रचना – वाट वाकडी ☆
☆मुळ गीत☆
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग, शोधिशी त्या यमुनेच्या जळी
ती वनमाला ,म्हणे नृपाळा,हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे, जललहरी सुंदर
रात्रीचे वनदेव पाहुनी,भुलतील रमणी तुला
तु वनराणी दिसे भुवन, या तुझिया रूपा तुला
अर्ध स्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी
भुलले तुजला ह्रदय साजणी, ये चल माझ्या घरी
गीतकार बालकवी
संगीत जितेंद्र अभिषेकी
नाटक संगीत मत्स्य गंधा
गायक आशालता वाफगावकर
☆ वाट वाकडी ☆
मर्द देखणे,तुझ्या सभोती, तू तर नवदेखणी
काय गवसले ,सांग षोडशे ,आवडला का कुणी ?
ती दचकोनी म्हणे तयाला ,अपुला रस्ता धर
करू नको तू वाट वाकडी, वळणावर सुंदर.
खात्रीचे ना दिसे कुणी ग,फसवतील हे तुला
तू फुलराणी ,गंध भारली, प्राशून घेतो तुला .
कडाडली ती दुर्गा होऊन , प्रसाद गालावरी
पादत्राणे घेत गरजली, जा पळ अपुल्या घरी.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.
मजेदार