सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है ग्राम्य संस्कृति की झलक प्रस्तुत कराती एक भावपूर्ण कविता हिरवा गाव.
☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – हिरवा गाव – ☆
हिरव्या साडीतली कुलीन केळ।
मांडवावरची शालीन वेल
हिरव्या पोरी मारताहेत भाव
वसलाय तेथे हिरवा गाव ।।
गुलमोहोराचं गुलजार रूप
प्राजक्त भोळा फुललाय खूप
पानांत रंगलाय पाखरांचा डाव
वसलाय तेथे ——–
शेवंती, चमेली, जाईजुई नाजुक
काट्यांतून हसतय गुलाबाचं कौतुक
कोरांटी, तगरीचा सरळ स्वभाव
वसलाय तेथे ——–
ऊंच माडांचे झुलताहेत पंखे
सलामी देताहेत अशोक उलटे
जास्वंद हसतेय लालम् लाल
वसलाय तेथे ——-
हिरव्या गावात पावसाचा उत्सव
फुलापानांचं, फळांचं वैभव
ढगांच्या भाराने वाकलंय आभाळ
वसलाय तेथे हिरवा गाव ।।
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070
अच्छी रचना