कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 73 – विजय साहित्य – आराधना .. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आराध्याचे आराधन

हीच खरी आराधना

जाण ठेवूनी करावी

आदर्शाची जोपासना. . . !

 

आराधना करताना

नको मनी अहंकार

मनोमन चिंतलेली

होई कामना साकार. . . . !

 

प्रेम प्रितीमध्ये हवी

विश्वासाची आराधना.

जुळुनीया येई नाते

हवी मनी संवेदना. . . . !

 

कुणीतरी कुणासाठी

जीव जातो लावूनीया

आराधना अंतरीची

जाई श्वास होऊनीया . . . . !

 

आराधने मध्ये हवे

एक माथा, दोन हात

प्रार्थनेच्या आरंभाला

आराधना तेलवात.. . !

 

ध्येयपूर्ती  आराधना

प्रयत्नांची हवी जोड

ज्ञान मिळवोनी साधू

यशकिर्ती बिनतोड. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments