कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 74 – विजय साहित्य – संस्कारांचे ताट ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
साहित्य सेवक।
दावितसे वाट।
संस्कारांचे ताट।
व्यासंगात ।।
साहित्य सेवक ।
अक्षरांचे घट ।
अनुभूती पट ।
साकारीती ।।
सुखदुःख झळ ।
शब्दांकित केली ।
अंतरात नेली।
भावसृष्टी ।।
साहित्य सेवक ।
सुख दाखवितो।
दुःख अव्हेरितो ।
साहित्यात ।।
साहित्य सेवक ।
लेखणीची वाणी ।
सृजन कहाणी ।
नवनीत ।।
साहित्य सेवक ।
सोडी राग लोभ ।
दुःख, द्वेष क्षोभ ।
भारवाही ।।
कविराजा हाती
शब्दपुष्प माला
केली जीवनाला
समर्पित. . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈