कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 115 – विजय साहित्य
☆ फुले ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
फुले फुलतात वाऱ्याने
कधी रंगीत वसनाने
फुले जगतात गंधाने
परागी गंधकोषाने..!
फुले हा आहेर मदनाचा
फुले हा शृंगार सृजनाचा
फुले संवाद सुखदायी
रतीचा सहवास फलदायी..!
फुले ही दौलत झाडांची
आभुषणे तृणपात्यांची.
फुले ही झुलत्या वेलींची
निशाणी हळव्या भेटीची..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈