कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है अंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस के अवसर पर आपकी एक समसामयिक कविता “ग्रंथगुरू . . . !” )
☆ साप्ताहिक स्तम्भ – विजय साहित्य ☆
☆ अंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस विशेष – ग्रंथगुरू . . . ! ☆
पूजनीय ग्रंथगुरू
नित्य हवे देणे घेणे
शिकविते चराचर
ज्ञान सृजनाचे लेणे. . . . !
वंदनीय ग्रंथगुरू
जगण्याचा मार्ग देते.
कृपा प्रसादे करून
सन्मार्गाच्या पथी येते. . . . . !
गुरू ईश्वरी संकेत
संस्काराची जपमाळ
शिकविते जिंकायला
संकटांचा वेळ, काळ. . . . . !
तेजोमयी ग्रूथगुरू
तेज चांदणीला येते
पौर्णिमेत आषाढीच्या
व्यास रूप साकारते.. . . !
ज्ञानदायी ग्रंथगुरू
घ्यावे जरा समजून
ऋण मानू त्या दात्यांचे
गुरू पुजन करून. . . . !
संस्कारीत ग्रंथगुरू
एक हात देणार्याचा
पिढ्या पिढ्या चालू आहे
एक हात घेणार्याचा.
असे ज्ञानाचे सृजन
ग्रथगुरू धडे देते
जीवनाच्या परीक्षेत
जगायला शिकविते. . . !
ज्ञानियांचा ज्ञानराजा
व्यासाचेच नाम घेई.
महाकाव्ये , वेद गाथा
ग्रंथगुरू ज्ञान देई. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.