सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ ओल्या चिंब तुझ्या हाका… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
ओल्या चिंब तुझ्या हाका
धावत वारीला आलो
विठू तुझ्या दर्शनाने
जन्म भरून पावलो
ओल्या चिंब तुझ्या हाका
दुःख विसरून गेलो
तहान भूक तूच रे
आज समजून गेलो
ओल्या चिंब तुझ्या हाका
ऊन पाऊस भेटीला
भजनात दंग झालो
आनंद होई जीवाला
ओल्या चिंब तुझ्या हाका
सर्वांभूती तू ईश्वर
विसर ना पडो कधी
हा देह आहे नश्वर
ओल्या चिंब तुझ्या हाका
प्रेमळ तो आशीर्वाद
भावाचा रे तू भुकेला
आम्हा कृपेचा प्रसाद
ओल्या चिंब तुझ्या हाका
पुनीत होई पंढरी
नाम तुझे घेता देवा
धन्य होई वारकरी.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈