श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 122 – गेली कित्येक वर्षी…… ☆
शहरात गेल्यापासून
तुम्ही पार विसरून गेलात मला..,
आज इतक्या वर्षानंतर
तुम्ही मला घर म्हणत असाल की नाही
ठाऊक नाही…
पण मी अजूनही सभांळून
ठेवलंय..,घराच घरपण
तुम्ही जस सोडून गेलात तसंच
गेल्या कित्येक वर्षीत
अनेक उन पावसाळ्यात
मी तग धरून उभा राहतोय
कसाबसा…. तुमच्या शिवाय…
रोज न चुकता तुमच्या सर्वांची
आठवण येते …
पण खर सांगू आता नाही
सहन होत हे ऊन वा-याचे घाव …
माझ्या छप्परांनी ही आता माझी साथ
सोडायचा निर्णय घेतलाय…
माझा दरवाजा तर तुमची वाट पाहून पाहून
कधीच माझा हात सोडून
निखळून पडलाय….
माझ्या समोरच अंगण तुळशीव्दावन
सगळच कसं दिसेनास झालंय आता…
माझ्या भिंतीनी माझा श्वास
मोकळा करून देण्या आधी
एकदा तरी फक्त एकदा तरी ….
मला भेटायला याल अशी आशा आहे…
तूमचं घर तुमची वाट पाहतय…
गेली कित्येक वर्षी…
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈