श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ श्रावणाचे तोरण ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
भारतीय वर्षाच्या दारी
श्रावण बांधतो तोरण
प्रत्येक दिवस ठरतो
कौतुकाचाच सण !…
नागपंचमीचा दिवस
माहेरवाशिणीचा खास
बळीराजाचा मित्र नाग
बंधू तिचाच होतो…!
सजते नारळी पौर्णिमा
बहीणभावाच्या प्रेमाने
घट्ट होतात त्यांची नाती
राखीच्या धाग्याने…!
संपविण्या दुष्ट शक्ती
कृष्ण जन्मतो याच मासी
राधाकृष्णाच्या प्रेमासी
सागराची भरती..!
गोपाळकाल्याचा दिस
बांधतो सख्य मित्रत्वाचे
कृष्णसुदाम्याचे मैत्रच
ठरले जगावेगळे…!
सप्ताहाचे सात वार
उलगडती सणांचे पदर
भारतीय संस्कृतीच्या
आदर्शांची…!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈