श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 118 – बाळ गीत – गुणवत्तेचा ध्यास ☆
गुणवत्तेचा ध्यास लागला
गुरुजींच्या राग पळाला ।
गुरुजी आले खेळायला
आलीय रंगत शिकण्याला ।।धृ।।
गोष्टी गाणी धमाल सारी
तालात नाचती पोरं पोरी ।
बदलून गेली शाळा सारी
गुरुजीही लागले नाचायला ।
हो आलीय रंगत … ।।१।।
साहित्याची जत्रा भरली
सारीच मुले खेळत रंगली।
खेळातून ही अक्षरे जुळली
मजाच येते ही शिकामाला
हो आलीय रंगत … ।।२।।
चढवू मुखवटे खोटे खोटे
बनुया सैनिक छोटे-छोटे ।
अभिनयातून गोष्टही पटे
खोटी तलवारी खेळायाला
हो आलीय रंगत … ।।३।।
अंका ऐवजी दाखवू बोटे
कृती करूनी अंकही पटे।
झटक्यात करू दशक सुटे।
टाळ्या नी वाजवायला ।
गणिती भाषा शिकण्याला … ।।४।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈