कवितेचा उत्सव
☆ कवीश्वर… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
कवी रचतो सृष्टी
सृष्टी नाम शब्द
शब्द होई काव्य
काव्य नूतन नित्य
नित्य रंगवी स्वरूप
स्वरूप निनादे स्वर
स्वर करत संकल्प
संकल्प साधत वाङ्मय
वाङ्मय प्रकट वाणी
वाणी दर्शन ईश्वर
ईश्वर वर्णाकृती जशी
जशी साक्षात चित्रवाणी
चित्रवाणी खेळ प्रकाश
प्रकाश अनंत दिव्य
दिव्य भासे विश्व
विश्व पालक विष्णू
विष्णू हाच कवीश्वर
विष्णू हाच कवीश्वर
© सौ. मुग्धा कानिटकर
सांगली
फोन 9403726078
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈