सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ घर व्हावे गोकुळ… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

विस्कटले… घरदार

हरवली…सारी नाती

उसवले… गणगोत

उदासल्या..साऱ्या भिंती…||१||

 

कुठे…लोपला जिव्हाळा

अंतरीचा… तो उमाळा

शोधूनिया… थकलोय

जिवलग… गोतावळा..||२||

 

सारी ..किमया पैशाची

जन..त्यामागे धावती

कोण पुढे…कोण मागे

जणू..शर्यत लावती…||३||

 

आई बाबा… वृद्धाश्रमी

मुले..पाळणाघरात

घर.. हसते खेळते

चित्र..दिसते स्वप्नात…||४||

 

हरवले…घरपण

चला…शोधून आणूया

एकमेंका…जपताना

घर…गोकुळ करूया…||५||

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments