श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 127 – आधार ☆
जरी ईश्वरा तू निराकार आहे
मनाला तुझा एक आधार आहे
नको वासना ती वृथा लोभ सारे
मनी मानसी एक ओंकार आहे
घडावा सदा संग तो सज्जनांचा
वृथा वागणे हा अहंकार आहे
स्मरावे तुझे रूप चित्ती असे तू
अनादी आनंता निराकार आहे
उणे वैगुणाला नसे येथ कांही
क्षमा याचनेला पुढाकार आहे
असावी कृपाही मला बालकाला
सदा ह्या पदांना नमस्कार आहे
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈