सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ संकल्प… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
सरले हे वर्ष मनुजा
स्वागत करुया नववर्षाचे
किती बेरजा किती वजा
क्षण आठवू सुखदु:खाचे..
कालचक्र हे अखंड चाले
पुन्हा न येते गेली वेळ
झटकू आळस कष्ट करु
जीवनाची फुलवू वेल..
ध्यानी असू दे एक तत्व
आयुष्या नसतो लघुमार्ग
नसते सुट्टी ना आराम
यत्ने अंती फुलेल स्वर्ग…
करा संकल्प नववर्षाचा
एक कूपी करा रिकामी
सुगंध नवा त्यात भरा
झटकून टाका जे निकामी..
नव्या पीढीचे तुम्ही स्तंभ
आण बाळगा सृजनाची
युद्ध नको शांती हवी
जगास द्या हाक प्रेमाची…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈