☆ कवितेचा उत्सव : वेदना! ☆ श्री मुबारक उमराणी ☆
किती सोसाव्या वेदना सुक्या रानी
छन्नी हातोड्याचे घाव या जीवनी
पावसाचा वादा खोटा पिक जळे
भेगाळल्या रानी पाणी मागे मळे
ढग आले तसे दूरदूर गेले
आस पावसाची मन दुःख झेले
मीही सोसे पिकासंगे आक्रोश
असा जीवनभोग सारा तो रोष
कधी मी लांबच्या ढगाशी भांडतो
दुःख माझे ते रानोमाळ सांडतो
वेडा होतो वेदना पिक पाहतांना
दुःख जळते सारे ते साहतांना
© श्री मुबारक उमराणी
राजर्षि शाहू कॉलोनी, शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈