सुश्री शोभना आगाशे
कवितेचा उत्सव
☆ निःसंग… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
जन्मा येता
सोडुनि जाशी
तू मातेची कुशी॥
बाल्य सरता
तशा लांघशी
गोकुळच्या वेशी॥
कंसास मारुनि
मथुरेस रक्षिसी
जिंकून शत्रूंसी॥
मथुरा नगरी
सोडुनि जासी
द्वारका वसविसी॥
तीच द्वारका
त्यागुनि देशी
सागरात बुडविशी॥
प्रभास क्षेत्री
अश्वत्थापाशी
मनुष्य देह त्यागिशी॥
मागे कधीही
न वळुनि पाहसी
कसा निःसंग राहसी?॥
– शोभना आगाशे
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈