प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
कवितेचा उत्सव
☆ थेम्सच्या किनारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
(काही संदर्भ- लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर मी लिहिलेली एक कविता )👇🏻
थेम्सच्या नदीकिनारी
पाहिला मी टाॅवर ब्रिज
ब्रिटिश राजसत्तेला
अभिवादन करताना
मध्यातून मुडपणारा.
थेम्सच्या नदीकिनारी
पाहिला मी लंडनब्रिज
मुखवटे घालून फिरणा-या
शेकडो माणसांच्या
घामांत भिजलेला.
थेम्सच्या नदीकिनारी
पाहिला मी एक भिकारी
कळकटलेल्या कपडयांवर
फेकलेली नाणी
गोळा करताना.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈