महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 117
☆ अभंग… अंतरी नसावा… ☆
आतला आवाज, ऐकावा सर्वांनी
साधावी पर्वणी, ज्याची त्यांनी.!!
अनेकांचे मत, ऐकुनीया घ्यावे
बाकीचे करावे, हवे-तेच.!!
उच नीच भेद, सोडूनिया द्यावा
सर्वांशी करावा, सद् व्यापार.!!
मनाची थोरवी, प्रगट करावी
अलिप्त असावी, वैर-बुद्धी.!!
कवी राज म्हणे, क्षण हा जपावा
अंतरी नसावा, अहंकार.!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈