श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 175
☆ उर्वशी… ☆
रोज रोज तू नवीन भासते अशी
दूरचा उगाच पाहु सांग का शशी ?
स्वर्गलोक छान वाटला कुणा जरी
भूवरील तूच मेनका नि उर्वशी
खूप दानशूर भेटतीलही तुला
काळजी जरूर घे पडू नको फशी
ओठ लाल बोलुदेत कान हासुदे
मूक मूक राहतेस तू अशी कशी
वात थंडगार फार देइ यातना
तप्त या मिठीस का उगाच टाळशी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈