श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ जागतिक महिला दिना निमित्त – आदि नारी ☆ श्रीशैल चौगुले ☆
जन्मोजन्मी सदैव युग हे
नारी गौरव जगद्जननी
सिता,कुंती सावित्री ही माता
हे विश्व दिले दर्शना अजनी.
जशी मृदा ही सृष्टी तारते
कौशल्येच्या संस्कार ऋणांनी
नि देवकी-यशोदा होऊन
प्रेम-भक्तीने कृपा क्षणांनी.
या नारीच्या चरणी जीवन
सर्व सुख यश तीस अर्पण
अनेक भुमिकेशी संसारी
केवळ ऊरते ती दर्पण.
या नारीचा हा जयजयकार
शब्दसुमने ऊधळी मन
माता मुलगी पत्नी देवी सत्य
सहस्त्र युगे जन्माचे धन.
श्रीशैल चौगुले.
९६७३०१२०९०.