श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 179
☆ महिला दिन… ☆
सकाळी सकाळी उठल्यावर
समोर माझ्या ठेवते चहा
आई, बहीण, बायको किंवा
ती मुलगी असते पहा…
माझ्या घरात रोज असे
सकाळ दुपार महिला दिन
मला वाटते रोजच व्हावे
त्याच्यासमोर आपण लीन…
महिला दिन चालू ठेवू
खरंच आपण वर्षभर
ज्यांच्यामुळे चालू आहे
या विश्वाचं चराचर…
आमच्या आवडीनिवडी पाहून
करतात त्या रोज नाष्टा
मीठ कमी साखर जास्त
म्हणत आम्ही करतो चेष्टा…
त्यांचे हात खेळत असतात
विस्तवाशी रोजच खेळ
चटक्याकडं लक्ष द्यायला
त्यांच्याकडे नसतोच वेळ…
तवा आणिक पातेले
कायमच देतात चटके
आमच्यासाठी बनवितात
स्वयंपाक त्या हटके…
आई आणि बायकोच्या
स्पर्शात असतो फरक
दोन्ही स्पर्श माझ्यासाठी
तरीही असतात प्रेरक…
प्रत्येक दिवस माझ्यासाठी
खरंच असतो महिला दिन
तुम्ही देखील नारीला
कसमजू नका कधीच हीन…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈