सौ. मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ वसंत पहाट… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
वसंतातली पहाट
चैत्रांगण रेखाटले
आंबेमोहोर गंधाने
अंगण ते सुखावले
मोगरीच्या सुमनांना
अलगद हो वेचले
गुढीपाडवा, तो आज
झेंडुसह मी गुंफिले
आंबा फाटे कडुनिंब
साखरेच्या गोड गाठी
ब्रम्हध्वजाच्या साक्षीने
शुभेच्छा तुमच्या साठी
आनंदी, आरोग्य दायी
जीवन तुम्हा लाभावे.
समाधानी आयुष्यात
सेवाकार्यात रमावे.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈