श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
😅 💃 राधेचा शेला ! 💃 😅 श्री प्रमोद वामन वर्तक
माता पुसतसे राधेला
येवून तिच्या महाली
तव शेल्यावर ही नवीन
निळाई गं कसली
पडली संभ्रमात राधा
आता काय सांगावे
प्राणाहून प्रिय मातेला
कारण काय ते द्यावे
आठवून रासरंग क्रीडा
राधा मनोमनी लाजली
धीर करुनी मग मातेला
हसत हसत उत्तरली
शेला उडोनी हरीच्या
मुखावरी बघ पडला
बहुदा रंग त्या मुखाचा
त्याने अलगद उचलला
उत्तर ऐकून राधेचे
माता गालात हसली
मुख झाकत शेल्याने
राधा अंतःपुरी पळाली
© प्रमोद वामन वर्तक
११-०२-२०२३
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈