श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 149 – बाळ गीत – ताई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
ताई माझी गुणांची
आहे मोठ्या मनाची ।
लहान-थोर साऱ्यांची
काळजी घेते सर्वांची।
☆
मंजुळ तिचा गळा
गाते जणू कोकिळा।
वाजवून खळखुळुा
समजावते बाळा।
☆
काम करते झरझर
पुस्तक वाचते सरसर।
सारेच करतात वरवर।
सर्वांनाच घालत असते
मायेची तिच्या पाखर।
☆
नाही तिथे काहीच उणे
तिच्या विना घर सुने।
घरात फुलते सदाच
तिचे हास्य चांदणे।
तिचेच हास्य चांदणे।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈