श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नदी दुथडी भरून आता निघाली माहेरी

काठावरी निरखती झाडं कावरी बावरी

 

गच्च भरतेस तेव्हा तुला ओढ भर्ताराची

ससे होलपट होते तेव्हा किती माहेराची

नको तोडू ताल बाई नको होऊस नवरी ॥ १ ॥ 

 

रानपालटत जाते दिस उगवून येतो

ओलसर पुनवेच्या मनी चांदवा रुजतो

नव्या जगण्यासाठीची होते मनाची तयारी ॥ २ ॥ 

 

आम्ही शेतकरी साधे तुझ्यावरी जडे जीव

तुझ्या कुशीत नांदते देते हुंकार वैभव

बाई तुझ्या ग पाण्याने आम्हा लाभते उभारी ॥ ३ ॥ 

 

तुझी गाताना थोरवी तुला म्हणती माऊली

भाव ठेऊन अंतरी तुझी पूजाही मांडली

तुझे पिऊन अमृत आम्ही जगतो शिवारी ॥ ४ ॥ 

 

तुझ्या काठी वसणारे तुला देवता मानती

तुला माहेरवाशीण म्हणूनीया पूजताती

 तुझ्या वटी भरणाला साडी चोळी जरतारी ॥ ५ ॥ 

 

अशी नको रोडाउस उन्हातानात तापून

हरघडी टाकी बाई तुझे पाऊल जपून

माझ्या मनाचे पाखरू झुरे पाणवठ्यावरी ॥ ६ ॥ 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments