श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 194
☆ तू दिलेले फूल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
लाटतो मी मीच पोळी भाजतो
ब्रह्मचाऱ्या सारखा मी राहतो
☆
भिंग वा चष्मा कशाला पाहिजे ?
भाव डोळ्यातील सहजच वाचतो
☆
तू दिलेले फूल वहितच वाळले
आठवातच त्या फुलाच्या जागतो
☆
तोच मुखडा तोच आठव सोबती
आसवांना पापण्यांनी दाबतो
☆
कारल्याचा वेल वरती देखणा
धर्म कडवट आत आहे पाळतो
☆
भेट होता एकमेकांची कधी
ती मला अन् मी तिलाही टाळतो
☆
राख हाती घेत पायाखालची
होत मी संन्यस्त भाळी लावतो
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈