श्री मुबारक बाबू उमराणी
☆ कवितेचा उत्सव : क्रोधाचे घर ☆ श्री मुबारक उमराणी ☆
घर क्रोधाचे छानच
नाकावर माशी जसा
राहा सावध नेहमी
भांडूनच दुखे घसा
हट्ट रागाची बहिण
हिंसा पत्नी सदा लढे
अंहकार त्याचा भाऊ
भय पिता घेई धडे
निंदा चुगली त्या मुली
एक लागे तोंडी सदा
दुजी भरी दोन्ही कान
देई ठोसे जशी गदा
वैर मुलगा क्रोशाचा
त्याची पत्नी इर्षा झाली
घृणा नात त्याची शोभे
आई उपेक्षा ती भ्याली
तुम्ही सारे रहा दूर
घरी नांदेल मंगल
सुख संपत्ती मांगल्य
शांती फुलेल जंगल
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈