☆ कवितेचा उत्सव ☆ तू….मी… ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

तू बरसात श्रावणाची ,

पाऊस मी वळीवाचा.

आकाश एक दोघांचे,

का भेद अविष्काराचा.

तू तरु धुंद बहराचा ,

मी वृक्ष पानगळीचा.

समजून घे जरासा,

फरक हा ऋतूंचा .

मी स्वैर शब्दशब्द,

तू नेमकी कविता .

जलप्रपात कोसळणारा मी,

तू नीरव शांत सरिता .

तू झुळुक शीतलगंध,

मी बेधुंद वादळवारा .

तम गहिवरला मी अवघा,

तू स्थिर नभीचा तारा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments