सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कोडे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सान होऊनी बांलकांसवे

भान विसरूनी खेळत जावे

हासत नाचत बागेमध्ये

फेर धरुनी फिरून यावे ||

 

मनात येते विहंग होऊन

आकाशी त्या मुक्त विहरावे

जगामधले अनन्य सुंदर

डोळे भरुनी पाहून घ्यावे ||

 

दुःख काळजा दूर होऊनी

ईश चरणी मन रमावे

अनन्यभावे शरण जाऊनी

नामस्मरणी रंगून जावे ||

 

ऐकू यावी बासरी अन

यमुनातीरी फेर धरावा

अलगुज होऊन कृष्णाची

कुंजवनी तो स्वर घुमावा ||

 

मन हे मोठे अजब आहे

कोडे जणू विश्वनियंत्याचे

कधी न होते इच्छापूर्ती

आवर्तन अनेक इच्छांचे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments