सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ कवितेचा उत्सव ☆ बाबूजी आणि आण्णा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
शब्द,सूर हे इथे नाचती
गळ्यात घालून गळा
बघता बघता बहरून येतो
संगीताचा मळा !!
बाबूजी अन् आण्णा जणू
बाजू दोन नाण्याच्या
देती रसिका भरभरून ते
ओंजळी दिव्य गाण्याच्या !!
बाबूजींचा स्वर मधुरसा
भीडे हृदयांतरी
जणू घंटानाद घुमतसे
गाभारी मंदिरी !!
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈