श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ नंदादीप… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
मनाच्या सुरक्षित कोप-यात
सतत तेवणारा
तुझा नंदादीप
भवसागरात भरकटलेल्या
माझ्या आकांक्षांच्या गलबताला किना-यावर प्रकाशमान झालेल्या परोपकारी दिपस्तंभासारखा वाटतो.
तो खुणावत असतो,
सांगत असतो,
ये , थांब इथं,
हा संपन्न किनारा सुरक्षित आहे तुझ्यासाठी.
इथ भक्कमपणे पाय रोवून बघ एकदा
आकाशाकडे
कर सेवा विशाल धरतीची
ती स्वीकारतील तुला,
पुरवील तुझ्या सर्व आकांक्षा,
पण अट एकच,
श्रद्धेनं वास्तवाला आलिंगन देण्याची,
चालत राहण्याची, .
स्वकष्टाने प्रकाशित होण्याची,
तरंगत राहून स्वप्नं
पूर्ण होत नाहीत कधी,
इथं वावरणारे सारेच तुला
सटीक समृद्धिची भाषा शिकवतील
दिशा दाखवतील
उज्वलतेच्या
कारण इथं अस्तित्वात असलेलं सारं
इथंच वाढणारं आणि
इथंच मुरणारं आहे.
इथे नाही गाज झुलवत ठेवणारी.
इथल्या प्रत्येक प्रकृतीला तुला मिठी मारता येईल माझीच म्हणून.
मग तुला नंदादीपाची
गरज भासणार नाही
कालांतराने तूच होशील नंदादीप वास्तवतेतला, पुजणारा, भजणारा, मानणारा.
आणि तिच्याच चरणी लीन होणारा.
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈