कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ सौभाग्य . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शतभाग्याचे पुण्य ते

ज्या ज्या कर्माने लाभते

पुण्यसंचयी क्षण ते

सौभाग्याचे नाव घेते. . . . !

 

श्रद्धा आणि सबुरीने

क्षण सौभाग्याचा येई

कधी होई स्वप्न पूर्ती

कधी दुःख लया जाई. . . . .!

 

सहजीवनात येती

सौभाग्याचे नाना क्षण

विश्वासाने वेचायचा

आठवांचा कण कण. . . . !

 

सौभाग्याच्या क्षणांमधे

सामावले कर्मफल

साथ हवी विश्वासाची

मिळे जगण्याचे बळ. . . . . !

 

काम, क्रोध, लोभ,  मोह,

सारे पापाचेच धनी

संयमाच्या अंकुशाने

करू संस्कार पेरणी. . . . !

 

दान द्यावे,  दान घ्यावे

दुःख, दैन्य,  दूर जावे

सौभाग्याचे क्षण असे

नात्यांमधे दृढ व्हावे. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments