सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रानातली‌ वाट ☆ सौ. विद्या पराडकर ☆

रानातली वाट ही

सजली कशी नागमोडी

झाडांच्या ग सावलीत

धावे बाई दुडदडी☘️

 

रानातील वाट ही

वा-यालाही‌ खुणावत

डोंगराकडे येई म्हणूनी

पुन्हा पुन्हा  विचारत☘️

 

कसा माळ बाई सुना

वारा लपुन लपून बैसे

आमराईला बघता बघता

गालातल्या गाली हासे☘️

 

रानातील वाट ही

सर्वांना खेळवत राही

तलावाला पाहून बाई

लाजून दिसेनाशी होई☘️

 

रानातील वाट ही

देवता प्रवाशांची असते

परोपकार दीप घेऊनी

मानवी जीवन उजळीते☘️

 

रानातील वाट ही

मला भारी वाटे  प्रिय

प्रवृत्ती कडून निवृत्ती कडे

जाणारी भासे माझी माय☘️

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..मो – ९२२५३३७३३०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments