कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 193 – विजय साहित्य ?

☆ जपणूक.. !  ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

येता‌ पालवी वयात

पान झाडाचे पिकते

सोने‌ होता आयुष्याचे

जग हिरवे दिसते.. ! १

ज्येष्ठ‌ होता आप्त कुणी

नका करू अवमान

स्वभावाचे गुणदोष

जाणा माणूस महान.. ! २

घाला‌‌ स्वभावा‌ मुरड

टाळा विक्षिप्त वागणे

नव्या डहाळीच्या‌ कानी

गूज‌ मनीचे सांगणे.. ! ३

आरोग्याचे ताळतंत्र

संयमाची धन्वंतरी

योग्य आहार विहार

औषधांची मात्रा खरी.. ! ४

तपासणी नियमित

तन मन जपताना

नातवांची जपू साय

ज्येष्ठपर्वी रमताना.. ! ५

अनुभव सफलता

सुख‌ समाधान शांती

नको वृद्धाश्रमी धन

जपू ज्येष्ठांना धामांती.. ! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments