☆ कवितेचा उत्सव ☆ तू….मी… ☆ श्री शरद कुलकर्णी☆
प्रत्येक जखमांनी,
खपली धरावी.
अट्टहास कशासाठी ?
वाहू द्यावं त्यांना,
प्रवाहित.
प्रत्येक प्रश्नांची,
उत्तरे शोधावी.
खटाटोप कशासाठी ?
राहू द्यावं त्यांना,
अनुत्तरित.
शोधण्यास वाट,
धडपड ती करावी.
पायपिट कशासाठी ?
चालावं होउन,
निर्वासित.
स्वर आपला शोधण्या,
आकांत मांडावा.
ध्यास कशासाठी ?
मूक रहावं ओठांनी ,
अनुच्चारित.
पानगळीच्या ऋतूंची,
जाण ती ठेवावी.
घालमेल कशासाठी?
जगावे निमूट,
वृक्षवत.
© श्री शरद कुलकर्णी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर कणिका