सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “बदल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
पालवीपूर्वी पानगळ
वादळापूर्वी शांतता
पावसापूर्वी रुक्षता
येतेच न चुकता…
पृथ्वीचं गोल फिरणं
ऋतुचक्र पालटतं
तक्रार करून
ते का कधी थांबतं??
बदल हा नियम निसर्गाचा
हस्तक्षेप नसतो तिथे कुणाचा
मार्ग एकच आनंदी जगण्याचा
निसर्गासोबत बदलण्याचा….
प्रत्येक क्षण पहायचा
भरभरून असतो जगायचा
एक ऋतू असतोच बहरण्याचा
संयमाने असतो तो अनुभवायचा….
काही गोष्टी अश्याच घडतात
आपल्या हातात त्या मूळीच नसतात
घडायचं ते घडून जातं
म्हणूनच जग हे न थांबता चालतं…
😊
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈