सौ. अलका ओमप्रकाश माळी
कवितेचा उत्सव
☆ – विश्वास… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
कितीदा स्वतः शी भांडावे..
गळी दाटल्या हुंदक्याना
मनातल्या मनातच कोंडावे..
सर्व जाणून ही हे वेडे मन
ऐकतच नाही..
नको भांडू स्वतः शी हे
त्याला पटतच नाही..
माहित असूनही काटेरी वाट
पुन्हा पुन्हा निवडावी..
रक्तबंबाळ करून स्वतःला
पुन्हा एक कडू आठवण उरी साठवावी..
बास झालं आता लोक
काय म्हणतील म्हणून जगणं..
माझं माझं म्हणून आगीशी खेळणं,
भस्म सारं होणारच आहे..
मग का पोळण्याची चिंता बाळगावी..
झोकून दिलं आजवर दुसऱ्यांसाठी..
चल उठ आता जगून घे
चार क्षण स्वतः साठी..
येईनात किती का अडचणी..
दिसू न दे कधी डोळ्यातलं पाणी..
विश्वास ठेव मनी सदैव जिंकण्याचा..
हाच विश्वास करेल मार्ग सोप्पा जगण्याचा…
©️®️सौ. अलका ओमप्रकाश…
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈