श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ सागर-किनारा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सागरा, माझी किना-याची सीमा
ठाऊक आहे मला,
पण कधी कधी
तुझ्या लाघवी लाटा
किना-यावर उतरतात.
पावलांशी खेळ मांडतात.
खळखळतात… फुटतात.
परत फिरताना
आत आत ओढून नेतात.
पायाखालची जमीन
कधी सुटते
कळतच नाही.
डोळे उघडतात,
तेव्हा दीसतं
चारी बाजूला सर्वदूर
पाणीच पाणी
गलाबुडी पाणी
माथ्यावरून वाहू लागतं तेव्हा हार्पाय हलतात.
तुझ्या विक्राळ लाटांशी
झुंजतात.
किना-याशी लागते तेव्हा, क्षमाशील किनारा
पावलांना आधार देतो. ह्रदयाशी कवळून धरतो
घट्ट….घट्ट……
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈