श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ दृष्टीकोन ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
निसर्गचित्र पाहून ती म्हणाली
बघ आभाळ
मी म्हणालो स्वप्नांचे विश्व.
ती म्हणाली वाहते पाणी.
मी म्हणालो जागृत जीवन
ती म्हणाली फुले
मी म्हणालो समर्पण
ती म्हणाली मार्ग दगडाचा
मी म्हणालो विकासाचा संघर्ष.
ती म्हणाली बैलबंडी
मी म्हणालो गतीचे सहजीवन
ती म्हणाली डोंगराची रांग
मी म्हणालो हिम्मत संघर्षाची
ती म्हणाली उगवता सूर्य
मी म्हणालो जगाचा पोशिंदा
ती म्हणाली शेत,शेतकरी
मी म्हणालो निर्मितीचा आनंद
ती म्हणाली अरे निसर्ग हा
मी म्हणालो दृष्टिकोन जीवनाचा
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈