श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ संध्याकाळ… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
दिशा कोंडल्या,सूर्यही लपला, क्षितिजाच्या पाठी
संधिकाल तेजाळून उठला, झगमगली सृष्टी
☆
सोनपाऊली हळूच आली, सुरेख संध्याकाळ
गळा शोभते तिच्या साजिरी, बगळ्यांची माळ
☆
पक्षी फिरले, गुरे परतली, हंबरती वासरे
दीप उजळले घराघरातून, भक्तीभाव पाझरे
☆
रात्रीसाठी सांज मावळे, हृदय किती थोर
मावळतीचे मनात माझ्या, निनादती नुपूर
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈