☆ कवितेचा उत्सव ?‍?आयुष्याच्या या टप्प्यावर?‍?  सुश्री प्रज्ञा मिरासदार 

आयुष्याच्या या टप्प्यावर आलो तेव्हा समजले |

खूप खूप झालं भोगून, सुख नि दु:ख पाहिले ||१||

 

वाटते आता पण, गेले त्याची खंत नको |

नकोशा क्षणांचे, गाठोडे बाळगणे नको ||2||

 

हव्याशा सुखद आठवांनाच पुन्हा आठवू या |

त्या स्मृतींच्या हिंदोळ्याचे हलके झोके घेऊ या ||3||

 

गतस्मृतींना उजाळा देताना रडायचे कशाला |

बळेबळे खोल जखमांना भिडायचे कशाला ||4||

 

नाही त्याने काही लाभ , नाही काही फायदा |

आपण आपल्या मनाप्रमाणे जगावे हाच आता कायदा ||5||

 

नको आता नाराजी नको ताप संताप |

देवधर्म करीत रहावे मनात नको काही पाप ||6||

 

वाचन मनन करीत रहावे चिंतन करावे ध्यानात |

योग्य व्यायाम , प्राणायाम मान राखावा जनात ||7||

 

मित्र मैत्रिणी जोडावे त्यांच्याशी  समरस व्हावे |

शक्य तेवढी मजा करावी सोडून द्यावे हेवेदावे ||8||

 

उतारवयातले आयुष्य जावे सुखा समाधानात |

सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हीच इच्छा असेल मनात ||9||

 

माझे दोन शब्द समर्पित मित्र मैत्रिणींसाठी |

काही तरी चांगले करून पुण्य बांधू गाठी ||10||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments