श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नातं… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
नात्यास आपल्या जरीही,
रुढ नाव कोणतेच नाही.
तरी कसे निक्षून सांगू,
आपल्यांत नातेच नाही.
☆
भान ठेऊ अंतराचे,
जे आजही रुंदावले.
थंडावले आवेग सारे,
मनोवेगही मंदावले.
☆
मेघ कांही भरुन आले,
आत्ताच ते बरसून गेले.
मागमूस अवघे पुसोनी,
आकाश माझे स्वच्छ झाले.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈