सौ. मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ मकर संक्रांत… ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
☆
उत्तम पोषण
गोडवा गुळाचा
क्रांती संक्रमण
आधार जगाचा
☆
मऊ मुलायम
तिळाची स्निग्धता
अक्षय हृदयात
निस्वार्थ जपता
☆
स्नेह वृद्धिंगत
होईल सर्वांचा
मकर संक्रांत
सण शुभेच्छांचा
☆
निरोगी मनात
उच्च सुविचार
गोड उच्चारण
विनम्र आचार
☆
आनंद देईल
प्रेमळ वर्तन
सत्यात येणार
आजचे कवन.
☆
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈