सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ स्वप्न अधुरे राहिले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
हात तुझा हाती होता,
राहून गेले चालणे !
साथ तुझी हवी होती,
जमले नाही थांबणे !… १
*
स्वप्नात थवा उंच गेला,
उडून नील आभाळी !
पहात बसले येथे,
भग्न स्वप्नं भूतकाळी !… २
*
अधुऱ्या स्वप्नांची माला,
गात होती माझ्या मनी!
गीत ते संपले कधी,
कळले नाही जीवनी !… ३
*
आक्रंदणाऱ्या रे मना,
दु:ख जगी दाऊ नको !
हसतील तुज सारे,
अगतिक होऊ नको!.. ४
*
जे मिळाले आजवर,
जपेन ते अंतरात !
आयुष्य सारे त्यावर,
पेलेल खंत मनात !…. ५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈