डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ वसंत पंचमी – शारदास्तवन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी
तुझा वास असू दे सकल अंतरंगी ||ध्रु||
☆
तुझ्या हाती वीणा मधूर सप्तसुरी
प्रभा तेजःपुंज प्रज्ञे सावरी
विलसे मयुरावरी सप्तरंगी
नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||१||
☆
तुझ्या अर्चनेचे दे संपूर्ण दान
तुझ्या ठायी अविचल राहू दे ध्यान
विवेका असो कांस बुद्धीतरंगी
नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||२||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈